किरकोळ गुंतवणुकीत बड्या कंपन्यांची स्पर्धा

3Dollarशांघाय - चीनमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांत मोठी अलिबाबा व टेन्सेंट होल्डिंग लिमिटेड या प्रमुख कंपन्यांची किरकोळ गुंतवणूक १ हजार अब्ज डॉलरच्या घरात गेली आहे. या कंपन्या डिजिटल वॉलेट निवडण्यासाठी व्यापाऱ्यांवर दबाव टाकू लागल्या आहेत. सुरवातीपासूनच या कंपन्यांनी किरकोळ व्यापारावर दहा अब्ज डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे.सध्या चिनी बाजारपेठेत ग्राहक व स्टोअरचालकांना आकर्षित करण्यासाठी घाऊक बाजारामध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. यासाठी स्पर्धामूल्य, वितरण, सोशल मीडिया आणि बड्या डेटा सेवांचा वापर केला जात आहे. याचा परिणाम म्हणून काही किरकोळ व्यापारी अलिबाबा व टेन्सेंट या दोन्ही कंपन्यांची बाजू न घेता व्यवसाय सोडून जात असल्याचे चित्र आहे. चालू महिन्यामध्ये अलिबाबा कंपनीने ४८६ दशलक्ष डॉलर किरकोळ व्यापारातील बड्या डेटा कंपन्यांमध्ये गुंतवले आहेत. चीनमधील १३ हजार अब्ज डॉलरच्या मोबाईल पेमेंट बाजारपेठेत अलिबाबा व टेन्सेंटमध्येअटीतटीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. ‘‘किरकोळ बाजारपेठेमध्ये पेमेंट हा प्रवेशाचा मार्ग क्लिीष्ट भाग बनला आहे. किरकोळ बाजारपेठेत बड्या कंपन्यांमध्ये कुणाची बाजू घ्यायची याबद्दल चिंतेचे वातावरण आहे,’’ असे शांघाय स्थित कॅंटरवर्ल्डपॅनल या बाजारपेठेच्या संशोधन संस्थेचे व्यवस्थापक जेसनयू यांनी सांगितले.