भारताच्या निर्यातीत सलग सहाव्या महिन्यात घट

भारताच्या निर्यातीत उतरता कल कायम असून, सलग सहाव्या महिन्यात निर्यातीत घट झाली आहे. मे महिन्यात भारताची निर्यात २०.१९ टक्क्यांनी कमी होऊन २२.३४ अब्ज डॉलरवर पोचली आहे. मे २०१४ मध्ये भारताने २७.९९ अब्ज डॉलर्स मूल्याची निर्यात केली होती. निर्यात कमी होण्यास क्रूड तेलाच्या किंमती, जागतिक मंदी आणि वधारलेला रुपया कारणीभूत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये निर्यातीत ७.२७ टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. मुख्य निर्यात क्षेत्र असलेले पेट्रोलियम उत्पादने, रत्ने आणि दागिने, अभियांत्रिकी आणि रसायने यांच्यात एप्रिलमध्ये  नकारात्मक वाढ झाली आहे.
मे महिन्यात आयातीत देखील घट झाली आहे. आयातीत १६.५२ टक्के घट झाली असून आयात ३२.७५ अब्ज डॉलरवर पोचली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात व्यापारी तूट देखील कमी झाली आहे. व्यापारी तूट १०.४ अब्ज डॉलरवर पोचली आहे. मे २०१४मध्ये व्यापारी तूट ११.२३ अब्ज डॉलर होती.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division