एप्रिलपासून घरं स्वस्त होणार, तब्बल पाच लाख रुपये वाचणार

april homeतुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 1 एप्रिलपर्यंत थांबणं आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.कारण जीएसटी काऊंसिलनं निर्माणाधीन बांधकाम प्रकल्प आणि स्वस्त घरांवर जीएसटी कमी केल्यानं घर खरेदी करताना लाखोंचा फायदा होणार आहे. खरं तर निर्माणाधीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतल्या फ्लॅटवर 12 टक्क्यांऐवजी 5 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्यामुळेच 45 लाख रुपयांच्या किमतीच्या घरामागे 5.82 लाखांची बचत होणार आहे. सद्यस्थितीत निर्माणाधीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतल्या फ्लॅटवर 12 टक्के जीएसटी आकारला जातो. तो कमी करून 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे जीएसटीमध्ये 7 टक्क्यांनी कपात होणार आहे. 45 लाख रुपयांच्या फ्लॅटवर 3.15 लाख रुपयांची सरळ बचत होणार आहे. 1 एप्रिलपासून हे नवे नियम लागू होणार आहेत. जर आपण पहिल्यांदाच घर खरेदी करत असल्यास पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गृहकर्जावर 2.67 लाख रुपयांची सबसिडी मिळते. अशा प्रकारे 3.15 लाख रुपये आणि 2.67 लाख रुपये मिळून तुमची जवळपास 5 लाखांपर्यंतची बचत होणार आहे.
मिळणारा फायदा पुढील स्वरूपात असेल ;
अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टीवरच्या GSTमध्ये कपात
अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टीवर GST 5 टक्के आकारण्याचं निश्चित करण्यात आलं.
इनपूटशिवाय टॅक्स क्रेडिटच्या अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टीवर GST 5 टक्के लागणार आहे.
अफोर्डेबल हाउसिंगवर 1 टक्का GST लावण्यास मंजुरी
ग्रुप ऑफ मिनिस्टर्सच्या 3% GST लावण्याच्या प्रस्तावाचा अनेक राज्यांनी केला विरोध
45 लाख रुपयांच्या अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टीवर 5 टक्के जीएसटी आकारला जाणार
नवे दर 1 एप्रिल 2019पासून लागू होणार आहेत.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division