औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्हच्या ताब्यात

mahindra takeover abd electricals 201903206590औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहतीतील औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स या अॅयल्युमिनियम डाय कास्टिंग कंपनीच्या ८७५.६ कोटींच्या समभागाची खरेदी महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह लि. कंपनीने केली असून, सदर कंपनी ताब्यात घेतली आहे. या गुंतवणुकीमुळे स्पेनमधील सीआयई ग्रुपचा मराठवाड्यात प्रवेश झाला आहे. औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लि.च्या संचालक मंडळाने मंगळवारी या युनिटचे हस्तांतर महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह लि.कडे केले. ८७५.६ कोटींच्या समभागाच्या खरेदीसह भविष्यातील ६२.२ कोटींच्या डीफर्ड पेमेंटचा समावेश यात आहे. १९८५ साली औरंगाबादेत स्थापन झालेली औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स लि. ही अॅ ल्युमिनियम डाय कास्टिंगमध्ये अग्रगण्य कंपनी आहे. औरंगाबादेतील बागला ग्रुपचे चितेगाव येथे ३ आणि पुणे व उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे प्रत्येकी एक असे अॅाल्युमिनियम डाय कास्टिंगचे देशातील ५ उत्पादन प्रकल्प आहेत. ऋषी बागला हे या कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. या व्यवहारादरम्यान मोतीलाल ओस्वाल यांनी आर्थिक सल्लागार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

सीआयईमुळे येथे नवीन गुंतवणूक होईल. एमसीआयई आणि सीआयईसोबतच्या भागीदारीमुळे औरंगाबाद इलेक्ट्रिकल्सला मोठी चालना मिळेल आणि जगातील अॅ ल्युमिनियम डाय कास्टिंगचा फायदा इतरांना होईल.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division