रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दरात तिसर्‍यांदा कपात

Reserve Bank of India Recruitment Notification 2015 01बिर्ला समूहातील वस्त्र विक्री क्षेत्रातील कंपन्यांचे एकाच कंपनीत विलीनीकरण झाल्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत. किरकोळ विक्री क्षेत्रातील आघाडीच्या फ्युचर समूहातील फ्युचर रिटेल स्पर्धक भारती रिटेलमध्ये सहभागी करण्यास उभय कंपन्यांची मान्यता मिळाल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले.
हा व्यवहार ९५० ते १,४५० कोटी दरम्यान झाला असल्याची शक्यता आहे. या विलिनीकरणाला आता भारतीय स्पर्धा आयोगाची परवानगी आवश्यक ठरेल. उभयतांची आता २४३ शहरांमध्ये ५७० दालन संख्या होणार आहे.
किशोर बियाणी यांच्या फ्युचर समूहातील फ्युचर रिटेल ही किरकोळ विक्री क्षेत्रातील उपकंपनी आहे. किरकोळ विक्रीऐवजी केवळ घाऊक बाजारात अमेरिकी कंपनी वॉलमार्टबरोबर भागीदारी कायम ठेवणाऱ्या भारती रिटेलने किरकोळ विक्री व्यवसायासाठी फ्युचर समूहाच्या माध्यमातून अन्य भागीदार निवडला आहे. याद्वारे फ्युचर व भारती, रिलायन्स रिटेलचा एकत्रित सामना करतील.
भारती रिटेलने अन्य एका स्वतंत्र निर्णयानुसार तिच्या रिटेल इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसाय नवा भागीदार फ्युचर रिटेलमध्ये विलीन केला आहे.

दृष्टिक्षेपात पतधोरण...
* रेपो दर पाव टक्क्यांनी घटून ७.२५ टक्क्यांवर; रोख राखीवता प्रमाण (सीआरआर) ४ टक्क्यांवर स्थिर
* रेपो दर कपात सामान्य ग्राहकांपर्यंत संक्रमित करण्याचे बँकांना आवाहन
* महागाई दरात जानेवारी २०१६ पर्यंत ६ टक्क्यांवर वाढ अपेक्षित
* किंमतवाढीवर नियंत्रणासाठी अन्नधान्य वितरण व व्यवस्थापन यंत्रणेत सुदृढता आवश्यक
* चालू आर्थिक वर्षांत अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर पूर्वअंदाजित ७.८ टक्क्यांपेक्षा कमी ७.६ टक्के राहील.
* सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून उत्पादक कर्जवितरण वाढेल यासाठी त्यांचे लक्ष्याधारित भांडवलीकरण सरकारकडून व्हावे
* तिसरे द्विमासिक धोरण ४ ऑगस्ट २०१५ रोजी

चार बँकांकडून कर्जदरात कपात!
रिझव्र्ह बँकेने रेपो दरात सलग तिसरी कपात केल्यानंतर स्टेट बँकेसह अन्य काही बँकांनी त्यांचे किमान कर्ज दर खाली आणले आहेत. सर्वप्रथम अलाहाबाद बँकेने तिचे दर ०.३० टक्क्याने कमी करत ९.९५ टक्क्यांवर आणले. यानंतर स्टेट बँकेनेही किमान दर ९.७० टक्क्यांपर्यंत आणून ठेवला आहे. स्टेट बँकेने गेल्या दोन महिन्यांत दुसऱ्यांदा दर कमी केले आहेत. त्याचप्रमाणे देना बॅंक व पंजाब अॅण्ड सिंध बँकेने त्यांचे किमान ऋण दर पाव टक्क्याने कमी करत ते आता १० टक्क्यांच्या उंबरठय़ावर आणून ठेवले आहेत. यामुळे उपरोक्त बँकांचे गृह, वाहन, शैक्षणिक कर्ज व्याज दर कमी होण्यास वाव आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division