टपाल खात्याकडून ५ लाख डेबिट कार्डसचे वाटप

DoP ATM cum Debit Cardगेल्या वर्षापासून भारतीय टपाल खात्याने डेबिट कार्ड देऊ करण्यास सुरूवात केली होती, आतापर्यंत टपाल खात्याकडून १०,००० डेबिट कार्डांचे वाटप करण्यात आले आहे. टपाल खात्याने येत्या दोन महिन्यात ५ लाख डेबिट कार्डचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

"सध्या हे कार्ड टपाल खात्याच्या १,५०० एटीएम केंद्रात म्हणून वापरता येणार आहे. लवकरच याचा वापर इतर बँकांच्या एटीएममार्फत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच मार्च ३१,२०१६ पर्यंत आमच्या सर्व शाखांचे बँकेत रूपांतर करण्याचे उद्दिष्ट आहे ", असे टपाल खात्याचे उप-महासंचालक एल एन शर्मा यांनी सांगितले.

भारतीय टपाल खात्याच्या २,६०० शाखांमध्ये कोअर बँकिंग प्रणालीचा(सीबीएस) अवलंब करण्यात आला आहे. त्याखेरीज १,००० अतिरिक्त एटीएम केंद्र सुरू करण्याचा विचार आहे. देशभरात टपाल खात्याच्या २५,००० शाखा आहेत.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division