औद्योगिक उत्पादन निर्देशांक

fbdc9151 4bcc 474c a095 9118e890215fमहाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१४-१५ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे क्रमश: देत आहोत.

वीज खरेदी

महावितरण कंपनीने २०१३-१४ मध्ये एकूण रू. ३९,५२६ कोटी किंमतीची १,००,११५ दशलक्ष युनिट्स वीज खरेदी केली, तर २०१२-१३ मध्ये रू. ३८,८५८ कोटी किंमतीची ९९,०६८ दशलक्ष युनिट्स वीज खरेदी केली होती. सन २०१४-१५ मध्ये डिसेंबर पर्यंत रु. ३४,६२७ कोटी किंमतीची ८५,४२१ दशलक्ष युनिट्स वीज खरेदी केली. 'बेस्ट'ने २०१३-१४ मध्ये रु. २,९३२ कोटी किंमतीची ४,६२४ दशलक्ष युनिट्स व २०१४-१५ मध्ये डिसेंबर पर्यंत रु. २,१४९ कोटी किंमतीची ३,७२५ दशलक्ष युनिट्स वीज खरेदी केली.

survey 2 sep

वि‍जेचा वापर

survey 1 sep

राज्यातील २०१३-१४ मधील वि‍जेचा एकूण वापर १,०२,९८९ दशलक्ष युनिट्स इतका असून तो मागील वर्षापेक्षा २.३ टक्के अधिक होता, तर २०१४-१५ मध्ये डिसेंबर पर्यंत ७७,६५२ दशलक्ष युनिट्स वापर हा २०१३-१४ मधील तत्सम कालावधीतील वापरापेक्षा १४.१ टक्के जास्त होता. राज्यातील विजेचा सर्वाधिक वापर औद्योगिक क्षेत्रात (३७.८ टक्के), तर त्या खालोखाल घरगुती क्षेत्रात (२३ टक्के) आणि कृषी क्षेत्रात (२१.१ टक्के) होता. या तीन क्षेत्रांचा एकत्रित वापर एकूण वीज वापराच्या ८१.९ टक्के होता. क्षेत्रनिहाय विजेचा वापर पुढील तक्त्यात दिला आहे.

survey 3 sepप्रमुख क्षेत्र निहाय भारतातील (२०१२-१३) आणि महाराष्ट्रातील (२०१२-१३ व २०१३-१४) दरडोई विजेचा अंतिम वापर पुढील तक्त्यात दिला आहे. स्थापित क्षमता, विद्युत निर्मिती, क्षेत्रनिहाय विजेचा वापर आणि दरडोई विजेचा अंतिम वापर यासंबंधीची मालिका पुढील तक्त्यात दिली आहे.

वीज दर

survey 5 sep

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची स्थापना वीज दर निश्चिती, वीज खरेदी आणि पारेषण व वितरण यंत्रणांच्या प्रापण प्रक्रियांचे नियमन, स्पर्धात्मक, कार्यक्षमता व काटकसरीस उत्तेजन यासाठी झाली. विद्युत अधिनियम, २००३ अन्वये आयोगाकडे आंतर-राज्य पारेषण आणि वीज वहन सुलभीकरण, वीज पारेषण, वितरण आणि खरेदी- विक्री करिता परवाने वितरण, सहवीजनिर्मिती व अक्षय ऊर्जा निर्मितीसा प्रोत्साहन ही अतिरिक्त कामे सोपविण्यात आली. सन २०१४-१५ मधील वीज दर पुढील तक्त्यात दिले आहेत.

विजेची मागणी व पुरवठा

survey 4 sep

विविध स्त्रोताद्वारे झालेली क्षमता वाढ, पायाभूत जाळ्यातील सुधारणा, पारेषण व वितरण हानीत झालेली घट आणि ऊर्जा संवर्धनाच्या उपाययोजनांमुळे वीज पुरवठ्यात सुधारणा झाली आहे. महावितरणाची २०१३-१४ मध्ये विजेची १४,४०६ मेगावॅटची सरासरी कमाल मागणी ५७६ मेगावॅट इतक्या तुटीचे भारनियमन करून भागविण्यात आली. तसेच २०१४-१५ मध्ये डिसेंबर पर्यंतची १५,९६६ मेगावॅटची सरासरी कमाल मागणी ४९३ मेगावॅट इतक्या तुटीचे भारनियमन करून भागविण्यात आली. सरासरी कमाल मागणीच्या वेळी विजेचा पुरवठा व तूट पुढील तक्त्यात दिली आहे.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division