सहकारी पणन संस्था

msid 52115038width 400resizemode 4cooprativeमहाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१५-१६ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे क्रमश: देत आहोत...

सहकारी पणन संस्था

सहकारी पणन संस्थांची संरचना त्रिस्तरीय आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्या. ही शिखर संस्था असून जिल्हास्तरावर जिल्हा सहकारी पणन संस्था तर ग्रामस्तरावर प्राथमिक सहकारी पणन संस्था कार्यरत आहेत. मार्च, २०१५ अखेर सुमारे ३६ टक्के सहकारी पणन संस्था तोट्यात होत्या तर मार्च, २०१४ अखेर सुमारे ३९ टक्के संस्था तोट्यात होत्या. सहकारी पणन संस्थांची कामगिरी खालील तक्त्यात दिली आहे.

survey 1

बिगर कृषि पतसंस्था

राज्यात मार्च, २०१५ अखेर ५१७ नागरी सहकारी बॅंका, १४,५७७ नागरी सहकारी पतपुरवठा संस्था व ७,२३२ पगारदार नोकरांच्या सहकारी संस्था होत्या. एकूण बिगर कृषि पतपुरवठा संस्थांपैकी सुमारे २२ टक्के संस्था तोट्यात होत्या. बिगर कृषि पतपुरवठा संस्थांची कामगिरी खालील तक्त्यात दिली आहे.

survey 2
देशातील एकूण १,५८३ नागरी सहकारी बॅंकापैकी ३२ टक्के बँका राज्यात स्थित आहेत. दिनांक ३१ मार्च, २०१५ रोजी एकूण १०९ बॅंका अवसायानात आहेत. विमा उतरविलेल्या १०२ बँकांतील रुपये एक लाखापेक्षा कमी रकमेच्या ठेवींना परतावा देण्यासाठी ‘ठेवी विमा पत हमी महामंडळ’ यांनी मान्यता दिली असून ठेवीच्या वितरणाची प्रक्रिया सुरु आहे. एका बँकेने केंद्र सरकारकडे अपील केले आहे तर उर्वरित बँकांचे दावे सादर करण्याची कार्यवाही सुरु आहे.

इतर सहकारी संस्था

राज्यात ३१ मार्च, २०१५ रोजी १,०२,२६५ सहकारी गृहनिर्माण संस्था होत्या, त्यातील सभासद संख्या २५.२६ लाख होती. तसेच ११,३६५ कंत्राटी मजूर संस्था होत्या त्यातील सभासद संख्या ८.१४ लाख होती.एकूण ७३,१३८ सदस्य संख्या असलेल्या ३०७ श्रमिक वाण संस्था होत्या, त्यापैकी १७६ संस्था (५७.३ टक्के) नफ्यात होत्या.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division