महाराष्ट्रातून निर्यात

exportमहाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१६-१७ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे क्रमश: देत आहोत...

राज्यातून मुख्यत्वे रत्ने व आभूषणे, पेट्रोकेमिकल्स, तयार कपडे, सुती धागे, धातू व धातू उत्पादने, शेतमालावर आधारित उत्पादने, अभियांत्रिकी उपकरणे, औषधे व औषधी द्रव्ये आणि प्लास्टिक व प्लास्टिकच्या वस्तू यांची निर्यात होते. महाराष्ट्र आणि भारतातून झालेली निर्यात खालील तक्त्यामध्ये दर्शविली आहे.
july 1

 

विशेष आर्थिक क्षेत्रे

राज्याने फेब्रुवारी २००६ पासून विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) धोरण स्वीकारले असून ऑक्टोबर २०१६ पर्यंत राज्यात २४३ विशेष आर्थिक क्षेत्रांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. राज्यामध्ये ३१ ऑक्टोबर २०१६ पर्यंत ७२ विशेष आर्थिक क्षेत्रांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. राज्यामध्ये ३१ ऑक्टोबर २०१६ पर्यंत ७२ विशेष आर्थिक क्षेत्रांची अधिसूचना रद्द झाली किंवा मागे घेण्यात आली आणि ३,०५९ हेक्टर क्षेत्रावर रु. ३२,२५५ कोटी गुंतवणुकीची २५ विशेष आर्थिक क्षेत्रे कार्यान्वित झाली व त्यामधून सुमारे ३.६० लाख रोजगार निर्मिती झाली आहे. मंजूर व अधिसूचित विशेष आर्थिक क्षेत्रे याबाबतची माहिती खालील तक्त्यामध्ये देण्यात आली आहे.

july 2

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division