महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळातर्फे
एम एस एम ई परिषद

conferance1महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाने १३ सप्टेंबर रोजी ८ वी वार्षिक एम एस एम ई काँफरन्स आयोजित केली होती. या कॉन्फरन्सचा विषय होता “क्लस्टर डेवलपमेंट - कलेक्टिव्ह ग्रोथ’!

उदघाटनाच्या सत्रामध्ये कमांडर दीपक नाईक, अध्यक्ष, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ, अरविंद वैद्य, सभापती, आय ई एस, सतीश लोटलीकर, ट्रस्टी, आय ई एस आणि डॉ. दिनेश हरसोलेकर, डायरेक्टर, आय ई एस मॅनजमेंट कॉलेज आणि रिसर्च सेंटर, श्रीराम दांडेकर, संचालक, कॅम्लिन, पूर्व - उपाध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, रिजनल डायरेक्टर, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ आदि मान्यवर सहभागी झाले.

त्यानंतरच्या विशेष सत्रात क्लस्टर डेव्हलपमेंट या विषयावर उमेश दाशरथी, पूर्व अध्यक्ष, सी एम आय ए, आणि सभापती, ऑटो क्लस्टर, औरंगाबाद, प्रसाद कोकीळ, अध्यक्ष, सी एम आय ए, आंद्रास हलास, ट्रेड कमिशनर, हंगेरी काँसुलेट आणि शेती व्यवसाय संघ, बुडापेस्ट यांनी आपापले विचार मांडले. हंगेरी देशाला विविध उद्योगांची संधी देण्यासाठी आणि प्रतिनिधी मंडळ नेण्यासाठी व्यासपीठ दिल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे आभार मानले.

conferance2या सत्राचे आभार प्रदर्शन रवी बोराटकर,उपाध्यक्ष, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ यांनी केले.

बिझनेस सत्र - १ हे " क्लस्टर योजनेचे संयोजन आणि सरकार चे प्रोत्साहन" या विषयावर आयोजित केले होते. हे सत्र अनिल गचके, अध्यक्ष - इंडस्ट्री समिती, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या सत्रामध्ये अमर देसाई, एम डी, आंबा क्लस्टर, रत्नागिरी, प्रसाद कोकीळ, अध्यक्ष, सी एम आय ए, औरंगाबाद आणि राजेंद्र घोरपडे , महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ, शेती विषयावरील क्लस्टर यांनी आपले विचार मांडले.

"वित्त आणि संरक्षण" हे बिझनेस सत्र २ अतुल कुलकर्णी, सल्लागार आणि भारतीय बंदर संस्था यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडले. प्रसाद केळकर, मुख्य महाव्यवस्थापक, सारस्वत बँक, तन्वीर, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, अनिल गचके, अध्यक्ष, इंडस्ट्री समिती, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ, शिरीष देशमुख, अध्यक्ष, डिफेन्स इक्विपमेंट मॅनुफॅक्टरर्स असोसिएशन, पुणे, गोविंद सदामते, ब्लू मार्क - एप चे सादरीकरण या सर्वांनी आपले विशेष योगदान येथे दिले.

बिझनेस सेशन ३ " क्लस्टर डेवलोपमेंट मधील यशस्वी कथा" हे अभय दफतरदार, डेप्युटी डायरेक्टर, एम एस एम ई, भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. शीला धारिया, डिफेन्स पुरवठादार, पुणे, विक्रम गायकवाड, पैठणी क्लस्टर, येवला, मानसी बिडकर, इलेक्ट्रॉनिक क्लस्टर, पुणे यांनी आपले अनुभव येथे मांडले.

कॉन्फरन्सच्या शेवटी समारोपाचे सत्र श्रीमती मीनल मोहाडीकर, उपाध्यक्ष, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division