सामुहिक प्रोस्ताहन योजना

technologyservicesमहाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने २०१७-१८ वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामधून राज्यातील औद्योगिक सद्यस्थिती, निर्मिती प्रकल्प तसेच थेट परदेशी गुंतवणूक याविषयीची माहिती व आकडेवारी येथे क्रमश: देत आहोत...

थेट विदेशी गुंतवणूक
राज्यात सातत्याने येणारा थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ शासनाने व्यवसाय सुलभीकरण, धोरणे, दर्जेदार पायाभूत सुविधा, प्रोत्साहन आणि कुशल मनुष्यबळ यासाठी घेतलेल्या अनेक उपक्रमांचा परिणाम आहे. देशातील थेट विदेशी गुंतवणुकीबाबत राज्य नेहमीच आघाडीवर राहिले आहे. औद्योगिक धोरण आणि संवर्धन विभाग, भारत सरकार यांच्या अहवालानुसार, एप्रिल 2000 ते सप्टेंबर 2017 पर्यंत राज्यात थेट परदेशी गुंतवणूक रुपये ६,११,७६० कोटी असून देशातील एकूण थेट परदेशी गुंतवणुकीच्या 31 टक्के आहे.

महाराष्ट्रातून निर्यात
राज्यातून मुख्यत्वे रत्ने व आभूषणे, पेट्रोकेमिकल्स, तयार कपडे, सुती धागे, धातू व अधातू उत्पादने, शेतमालावर आधारित उत्पादने ,अभियांत्रिकी उपकरणे ,औषधे व औषधी द्रव्ये आणि प्लास्टिक व प्लास्टिकच्या वस्तू यांची निर्यात होते .निर्यातीकरिता पारितोषिक देणे व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग घेण्यासाठी लघु उद्योगांना जागा भाडे, अनुदान योजना राबवणे याकरिता राज्य पुढाकार घेत आहे .महाराष्ट्र आणि भारतातून झालेली निर्यात तक्ता 8.4 मध्ये दर्शविली आहे.

chart

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division