हर्षवर्धन भावे - 'फंक्शनल लिपिड्स'च्या उत्पादनांमध्ये अग्रेसर

harshvardhan bhaveहर्षवर्धन भावे जागतिक स्तरावर 'फंक्शनल लिपिड्स'च्या उत्पादनांमध्ये अग्रेसर आहेत. जी अन्न आणि पशुखाद्य यांमध्ये पूरक म्हणून वापरली जातात. त्यांनी फंक्शनल लिपिड्स बनवणाऱ्या दोन उद्योग समूहांची व उत्पादन कारखान्यांची उभारणी केली.

हर्षवर्धन भावे हे केमिकल इंजिनिअर असून आता एक प्रतिष्ठित उद्योजक आहेत. भारत सिंगापूर आणि मलेशिया येथे त्यांनी सुरू केलेले उद्योग यशस्वी झाले आहेत. फंक्शनल लिपिड्स आणि आपल्या व्यवसायाप्रति असलेले प्रेम हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. हर्षवर्धन भावे हे मूळचे औरंगाबादचे एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. जिथे शिक्षण आणि प्रामाणिक मेहनत याला खूपच महत्त्व होते. भावे यांना व्यवसायाचे पहिले धडे त्यांच्या वडिलांकडूनच मिळाले. त्यांचे शालेय शिक्षण औरंगाबाद येथे झाले असून माटुंगा येथील रुईया कॉलेजमधून त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले व युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (UCDT) येथे केमिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. रसायनशास्त्राचा अभ्यास करतानाच हर्षवर्धन यांच्या यशस्वी कारकीर्दीचा पाया घातला गेला. युसीडीटी येथून पदवी प्राप्त केल्यावर हर्षवर्धन यांनी बॉम्बे डाईंग मध्ये व्यवस्थापनातील शिकाऊ उमेदवार म्हणून काम करण्यास सुरुवात केली तरीही त्यांना व्यवस्थापनातील पदवी मिळवण्याची आस होती. त्यांनी पुण्याला सिम्बॉयसिस संस्थेत प्रवेश घेतला. हा निर्णय घेण्यास आणखीन एक कारण होते हायको प्रॉडक्टचे धामणकर यांनी त्यांना खोपोली येथे ऑप्टिमायझेशन या विषयात प्रोजेक्ट करण्यासाठी बोलावले. ही हर्षवर्धन यांच्यासाठी उत्तम संधी होती कारण ऑप्टिमायझेशन हा त्यांचा एमबीएसाठी मॅनेजमेंट अभ्यासातला विषय होता आणि त्यांना याच विषयात प्रोजेक्ट करायचेच होते. हा ऐच्छिक विषय फक्त पुणे विद्यापीठ देऊ करत होते. असे सारे काही जुळून आले आणि कामाला सुरुवात झाली. या कामाबद्दल त्यांना मोबदला मिळत होता. हाच त्यांच्या पुढील आयुष्यातील कारकिर्दीचा पाया होता. ऑप्टिमायझेशन प्रोजेक्टमध्ये फंक्शनल लीपिडस विशिष्ट तेल आणि स्निग्ध पदार्थ यांचे औषधी गुणधर्म आहेत. ऑप्टिमायझेशन प्रोजेक्टचा कोठे उपयोग होऊ शकेल याचा विचार करताना त्यांच्या लक्षात आले की फंक्शनल लीपिडस तयार करण्याइतकेच ते बाजारात आणणे ही आव्हानात्मक आहे.

एमबीए पूर्ण केल्यानंतर हर्षवर्धन यांनी सँडोझमध्ये काम करण्यास सुरुवात केली. सँडोझचा एक विभाग जो फंक्शनल लीपिडस संबंधित काम करत असे. फंक्शनल लीपिडसचा उपयोग चामडे, पेपर, कापड आदी उद्योग आणि तेल विहिरी इत्यादी क्षेत्रात होतो. काही वर्ष हर्षवर्धन यांनी सँडोझमध्ये काम केले आणि व्यवस्थापकीय शिकाऊ उमेदवार या पदापासून प्रगती करत ते मॅनेजर या पदापर्यंत पोचले. 1990मध्ये मलेशियातील 'सेंचुरी' या बिर्ला यांच्या कंपनीतून त्यांना नोकरीसाठी आमंत्रण मिळाले. ही परदेशी व्यक्तींसाठी असलेली वरच्या श्रेणीची नोकरी होती. उत्तम पगार व बाकीच्या सोयी सुविधा देणारी. तेथे त्यांना आदित्य बिर्ला यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. पॅन सेंच्युरी मध्ये ते मार्केटिंग मॅनेजर पासून उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिडेंट) बनले. फंक्शनल लिपीड या शाखेचे जागतिक प्रमुख (ग्लोबल हेड) झाले.
आदित्य बिर्ला यांच्या अकाली झालेल्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र कुमार मंगलम बिर्ला यांनी मलेशिया येथील उद्योग कमी करण्याचा निर्णय घेतला. यांच्या उद्योगाची एक छोटीशी शाखा फंक्शनल लिपीड तयार करत असे, ती हर्षवर्धन यांनी घेतली. त्यासाठी लागणाऱ्या रकमेची गरज फोल्कमार वायविओल या जर्मन गृहस्थांनी केली ज्यांचा हर्षवर्धन यांच्या कर्तृत्वावर विश्वास होता. हर्षवर्धन यांना मलेशियाचे 'टॅन श्री' टी.वाय.लिम यांचेही खूप आभार मानावेसे वाटतात कारण त्यांनी हर्षवर्धन यांच्या कर्तृत्वावर विश्वास दाखवत फंक्शनल लिपिड्स तयार करण्याच्या उद्योगात कामावर यांच्यासह भांडवली गुंतवणूक केली. 'टॅनश्री' हा मलेशियाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आहे. हर्षवर्धन यांनी पहिली तीन वर्षे आपल्या मलेशियातील उद्योगावर पूर्ण लक्ष केंद्रित केले त्यानंतर, त्यांनी भारतात आपला व्यवसाय व निर्मिती उद्योग सुरू केला. अशाप्रकारे GIIAVA India Hightech Energy/Berg+schmidt India ची सुरुवात भारतात वेगवेगळ्या ठिकाणी पशुखाद्य प्रक्रिया उद्योगांसाठी झाली. GIIAVA ही सोया आणि पावडर स्वरूपात तयार करणारी आणि निर्यात करणाऱ्या मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. यांचे तेल काढण्याचे कारखाने भारतात व मलेशियात आहे हर्षवर्धन यांचा महाराष्ट्रातील कारखाना वाई येथे आहे

GIIAVA कंपनीच्या वेगवेगळ्या निर्मिती कारखान्यात GM(जेनेटिकली मॉडिफाइड) सोया, NON GM आणि सनफ्लॉवर लेसिथीन तयार केले जाते. यात विविध प्रकारचे सोया आणि संच पावडर स्वरूपात करते याचा उपयोग खाद्यान्न आणि पौष्टिक आहार वगैरे उद्योगधंद्यांमध्ये केला जातो. GIIAVA ची निर्यात युरोप दक्षिण पूर्व आशिया मध्य पूर्वेकडील 25 पेक्षा जास्त देशांमध्ये होते. भारत आणि सिंगापूर येथील संशोधन केंद्रांमध्ये नवनवीन प्रक्रिया शोधण्याचे काम केले जाते त्यांच्यासह लग्नसंस्था ही पशुखाद्य निर्मिती मध्ये मदत करत असतात. फंक्शनल लिपिड्स असे विशिष्ट प्रकारचे तेल वस्तीत स्निग्ध पदार्थ असतात काम म्हणजे अन्नातून आलेल्या पदार्थ यांचे उत्तम प्रकारे पचन करणे शरीराला ऊर्जा पुरवणे हेच फक्त तेल आणि सिद्धांचे काम नसते तर, तेलात विद्राव्य असणाऱ्या जीवनसत्वे आणि त्यांचे शोषण करण्याचे कामही ते करत असतात. जीवनसत्वे A,D,E आणि K हाडे आणि मास पेशी तयार करण्यात मदत करत असतात. ही जीवनसत्वे शरीरातील पेशींना स्निग्ध पदार्थ पुरवली जातात. पदार्थांच्या पचनासाठी फंक्शनली मदत करतात म्हणजेच फंक्शनल लिपिड्सचा माणसांच्या आणि प्राण्यांच्या आहारात पूरक अन्न म्हणून उपयोग केला तर जीवनसत्वांचे शोषण आणि हाडाच्या आणि मांस पेशीच्या संवर्धन या महत्त्वाच्या भूमिका बजावतात. हर्षवर्धन हे असेच फंक्शन लिपिड्स बनवतात ते दुग्धजन्य पदार्थ व बालान्न यात वापरले जातात.

ग्लॅक्सो, फायझर सारख्या कंपन्या आपल्या बालान्नामध्ये हर्षवर्धन यांच्या कंपनीत बनवलेले 'फंक्शनल लिपिड्स' वापरतात. वारणा, अमूल, गोकुळ, चितळे यांसारख्या कंपन्याही त्यांनी बनवलेले फंक्शनल लिपिड्स त्यांच्या दुग्धजन्य पदार्थ वापरतात. पशुखाद्यात हे फंक्शन घेतले जातात. त्यांची बहुतेक उत्पादने सोया सनफ्लावर स्वीट्स आणि भाताचा कोंडा यापासून तयार केले जातात हर्षवर्धन हे जागतिक स्तरावर फंक्शनल उत्पादनांमध्ये अग्रेसर आहेत त्यांचे शून्यातून निर्माण केलेले दोन मोठे कारखाने एमआयडीसी वाई मजुरांना थायलंड सिंगापूर येथे आहे. भारतात चार ठिकाणी त्यांच्यासाठी निर्मिती उद्योग सुरू केले. 2006 साली शंभर कोटी रुपयांचा असलेला व्यवसाय आतात 300 कोटींच्या पुढे गेला आहे. पुढील काही वर्षात तो 500 कोटींच्या पुढे नेण्याचा त्यांचा मानस आहे.

हर्षवर्धन दुसऱ्या कंपन्यांचे व्यवहार करतात आणि हे करताना प्रमुख भागीदार म्हणून कंपन्यांच्या प्रगतीकडे त्यांचे पूर्ण लक्ष असते पण त्याच वेळी ते व्यवहार करत असलेल्या कंपन्यांच्या फायद्याकडे ही दुर्लक्ष करत नाहीत. त्यांचा विश्वास आहे की सतत सुधारणा करीत अखंड उत्पादन करण्याचे बाजारातले अग्रगण्य स्थान टिकवता येते. भारतामध्ये मध्यम क्षमतेच्या व्यवसाय उद्योगांना खूप संधी आहे. भारतात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांना मध्यम क्षमतेचे उद्योग हे अगदी योग्य क्षेत्र आहे. त्यांच्यामध्ये 2025 पर्यंत भारतात उद्योग व्यवसायांची खूप वाढ होणार आहे.

त्यांना वाटते की भारतात असे असंख्य छोटे छोटे उद्योग आहेत ते फार काळ टिकू शकत नाही. मध्यम क्षमतेचे उद्योग हे पुढच्या पिढीकडे सोपवली पाहिजेत. व्यवसाय खूप काळापर्यंत उत्तम चालू राहण्यासाठी व पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याचे आराखडे ही ठरवले गेले पाहिजेत. व्यवसाय वाढीसाठी तो पुढील काळातही व्यवस्थितरित्या चालू राहिला पाहिजे ही गोष्ट व्यावसायिकांच्या मनावर बिंबवणे त्यांना महत्त्वाचे वाटते.

 

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division