व्यावसायिक चातुर्य आणि तांत्रिक ज्ञानाची कास धरणारे
                                                             - उपेंद्र कुलकर्णी

Upendra kulakarniउपेंद्र कुलकर्णी सॉफ्टवेअर विभागाच्या नॉन व्होलॅटाईल मेमरी सोल्यूशन्स ग्रुपचे उपाध्यक्ष आणि सरव्यवस्थापक आहेत. त्यांच्या अधिकारात सातशे अभियंत्यांचे नेतृत्व असून इंटेलच्या 3 DNAND फ्लॅश आणि 3DX पॉईंट विकसित करण्याचे काम वर्तमानात त्यांच्याकडे आहे. याशिवाय ते अॅबसेंशीया व्ही.आर.प्रा.लि. बंगळुरूस्थित आभासी वास्तव कंपनीचे प्रमुख तांत्रिक सल्लागार आहेत. तसेच कॅलिफोर्नियास्थित एका ना-नफा संघटनेच्या CEO चे वरिष्ठ सल्लागार आहेत.

नावीन्याचा ध्यास आणि लोकाभिमुखता असे नेतृत्वगुण असलेले उपेंद्र त्यांच्यातील व्यावसायिकता आणि कुशाग्र बुद्धीचा जबरदस्त ताळमेळ साधून अत्याधुनिक संगणक निर्मितीसाठी एका मोठ्या संस्थेचे नेतृत्व करतात. एक सिद्धहस्त संगणक अभियंता, विश्लेषक-चिंतक, सृजनात्मकरित्या समस्यांचे निराकरण करणारा हा प्रभावी लोकनायक आहे. महाराष्ट्रातील मिरज गावातील एका उच्च शिक्षित कुटुंबात 1963 साली उपेंद्रचा जन्म झाला. बालपणी उपेंद्र एक अत्यंत जिज्ञासू मुलगा होता. भोवतालची प्रत्येक गोष्ट कशी काम करते हे जाणून घेण्याची त्याला उत्सुकता असे. 'अंडरस्टँडिंग सायन्स' या धाटणीतील मासिक ते अथपासून इतिपर्यंत वाचून काढत असत, त्यांची जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देत नसे. घड्याळ, इस्त्री, स्कूटरचे ब्रेक, सायकल चेन विजेवरचा पंखा आणि मिक्सर जे हाती आलं त्याचा एक भाग वेगळा करून ठेवत असे. त्याला आतील यंत्रणा कशी चालते याची तर उत्कंठा होतीच शिवाय भाग सुटे करणे आणि पुन्हा जोडणे हे शिकायचीसुद्धा प्रचंड हौस होती. तथापि, त्यांच्या सांगण्याप्रमाणे अधिकतर वेळा पुनजोडणी न सुचल्यामुळे तो पसारा त्यांना तसाच सोडून द्यावा लागायचा आणि नंतर आई-वडिलांकडून बराच ओरडा सहन करावा लागत असे.

मिरजच्या मराठे विद्यालय ह्या एका लहानशा सरकारी शाळेत उपेंद्र यांचे शिक्षण झाले. उपेंद्रचे वडील त्या शाळेचे संस्थापक सदस्य होते.
तिथे शिकायला येणारे बहुतेक सोबती आर्थिक दृष्ट्या कमकुवत घरातून आलेले असत आणि त्यांना गणित आणि विज्ञान हे दोन विषय फार जड जायचे. भूपेंद्र त्यांना हे विषय शाळा सुटल्यानंतरच्या वेळेत शिकवत असे. दरवर्षी उपेन्द्रआ परीक्षेत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर कायम राहत असे. अकरावी आणि बारावीचे वर्ग उपेंद्र मिरजच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकले. बारावीत इतके चांगले गुण मिळाले की अभियांत्रिकी आणि वैद्यक शास्त्र अशा दोन्ही विषयात प्रवेश मिळण्यास तो पात्र ठरला होता. तथापि त्याने त्याची रुची आणि मुळातला कल लक्षात घेऊन अभियंता व्हायचं ठरवलं. कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे येथून पूर्ण केलं आणि नंतर अमेरिकेला जाऊन व्हर्जिनिया टेक येथून इलेक्ट्रिकल आणि कम्प्युटर इंजिनीअरिंग विषय घेऊन पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला.

शिकण्यासाठी अमेरिकेला जाण्याचा आग्रह उपेंद्रच्या वडिलांचा. भूपेंद्रचे वडील स्वतः एका अशा कुटुंबात वाढले होते जिथे शिक्षणाला फार महत्त्व दिलं जायचं. सुरुवातीला उपेंद्रकडे शिष्यवृत्ती नव्हती. प्रथम सत्रात सर्वोत्कृष्ट गुण मिळवल्यानंतर शैक्षणिक सहायता निधीसाठी पात्र ठरले. त्यामुळे पुढचे शिक्षण सोपे झाले. प्रा.डॉ वॅन यांनी उपेंद्रमधील प्रतिभा हेरली आणि त्यांना शैक्षणिक सहायता मिळवून देण्यासाठी भरपूर मदत केली. एमएस पूर्ण केल्यानंतर उपेंद्र नवीन पदवीधर म्हणून इंटेल कॉर्पोरेशनला रुजू झाले. येथे त्यांनी ज्या कामाला हात लावला त्यात ते उत्कृष्ट ठरत गेले. त्याला कारण होती चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याची त्यांची क्षमता. परिणाम असा झाला की बहुविध प्रबंधकीय पदोन्नत्या त्यांच्या वाटेला येत राहिल्या. गरज असेल तिथे योग्य तो परिणाम साधण्याकरिता जोखीम घेण्यास ते कधी कचरले नाहीत.
इंटेलला त्यांना काही चांगली माणसं प्रबंधक/मार्गदर्शक म्हणून लाभली. रँडी विलहेल्म, जॉन बारटन आणि जॉन खजाम या तिघांनी उपकेंद्राची व्यावसायिक कारकीर्द घडवण्यास मदत केली होती. त्यांनी स्वतःस भरवशाचे नेतृत्व म्हणून सिद्ध केलं आणि 2012 मध्ये ते इंटेलचे उपाध्यक्ष झाले.

1988 ते 1999 अशी सुमारे बारा वर्ष इंटेलमध्ये उपेंद्रकडे तांत्रिक आणि संशोधनात्मक स्वरूपाचं काम देण्यात आलं होतं. या काळात त्यांनी स्वतःच्या नावे तब्बल सहा पेटंट नोंदविले. 1999 मध्ये त्यांना प्रबंधकीय पद प्राप्त झाल्यानंतर त्यांचे स्वतंत्रपणे चालणार संशोधनाचं काम थोडं मागे पडलं. एक नवीन आणि तरुण कर्मचारी म्हणून उपेंद्र कामाचं बारीक निरीक्षण करीत असत आणि उत्पादन व परिणाम दोन्ही चांगले व्हावे यासाठी वेळोवेळी सूचना देत असत. त्यांचीही सक्रियता वरिष्ठांच्या नजरेत भरत होती. 1989मध्ये उपेंद्र यांचा सहकर्मचारी पलॆमटर यांच्या जोडीने काम करत असत. तेच पलॆमटर नंतर इंटेलचे कार्यकारी उपाध्यक्ष बनले. त्यांनी उपेंद्रना प्रबंधकीय कार्यात लवकर संधी दिली. तांत्रिक कार्यापासून दूर होण्याचा उपेन्द्रे लोकं आणि व्यवस्थापन या विषयाकडे वळले. कंपनीचे उपाध्यक्ष तसेच फर्मवर आणि सॉफ्टवेअर विभागाच्या सहव्यवस्थापकाच्या वर्तमान भूमिकेत ते आणि त्यांची टीम इंटेलच्या एस.एस.डी आणि ऑप्टेन टीएम उत्पादनांची रचना, विकास आणि मान्यता तीन कारणांसाठी जबाबदार असे. ही भूमिका वाट्याला येण्याच्या 14 वर्षांपूर्वी उपेंद्र उपाध्यक्ष तसेच संचालक, ग्राफिक्स सॉफ्टवेअर विकास आणि मान्यता या पदावर होते तेव्हा त्यांच्याकडे जबाबदारी होती इंटेलच्या त्या जागतिक टीमच्या कार्याची. उच्च क्षमतेचे ऊर्जा आधारित ३ डी, मीडिया आणि डिस्प्ले ड्रायव्हर्स ही टीम विंडोज, मॅकओएस, लायनक्स आणि अँड्रॉइड आवरण प्रणाली यांचे करिता विकसित करीत असे. उद्देश हा की इंटेलचा मीडिया सर्वसॆ, एन्ट्री वर्कस्टेशन्स, क्लाएंट पीसी/ अल्ट्राबूक, टॅबलेट आणि स्मार्टफोन इतक्या उत्पादनांना आधार मिळावा. ग्राफिक्समध्ये वरील जबाबदारी पार पडण्याच्या आधी सुमारे चौदा वर्षे उपेंद्रकडे वरिष्ठ प्रबंधन आतील अनेक भूमिका चालून आल्या होत्या. त्यात प्रणाली मान्यता रचना आणि उत्पादन अभियांत्रिकी, आलेख, सीपीयू आणि मॅथ प्रोसेसर प्राॅडक्स इ. समाविष्ट होत्या.

इंटेलमध्ये त्यांनी ज्या टीमचे नेतृत्व केले त्या टीमनी पंधरापेक्षा अधिक उच्च कोटीची एकात्मिक ग्राफिक उत्पादन दिली. उदा. इंटेल ए, पॅटीयम A, प्रोसेसर लाईन ऑफ सीपीयू, अनेक पी.सी.आय/एजीपी, चीपलेट्स आणि ८०३८७ मॅथ को-प्रोसेसर. ह्या उत्पादनांनी इंटेल तसेच संबंधित उद्योगांना अनेक प्रकारचे नवीन तंत्रज्ञान पहिल्यांदाच उपलब्ध करून दिले. इंटेलकरिता प्रगतीची नवीन दालन उघडून दिली होती. ग्राफिक्स ड्रायव्हर विकसित करण्याच्या दृष्टीने त्यांनी नवीन कार्यपद्धती विकसित केली. दक्षिण कॅरोलविना, पिनँग, पोलंड आणि चीन येथील कार्यस्थळी नवीन टीमचा विस्तार आणि विकास घडवून त्यांनी कार्यक्षमतेत वाढ केली. अशाप्रकारे उपेंद्र यांनी संस्थागत कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

विविध देशांमध्ये स्थित व्यक्तींची टीम तयार करणे आणि त्यांचे नेतृत्व करून स्पर्धात्मक उत्पादन निर्धारित वेळेत आर्थिक मर्यादा आणि उच्च दर्जा सांभाळून तयार करणे यात उपेंद्र यांचा हातखंडा आहे. व्यावसायिक चातुर्य, तांत्रिक ज्ञानाची खोली, संघटनात्मक कार्य आणि लोक नेतृत्वाचे कौशल्य इतक्या गोड यांचे उच्च दर्जाचे मिश्रण भूपेंद्र यांच्या अंगी आहे. 220 दशलक्ष डॉलर्सचा आर्थिक अर्थसंकल्प आणि वित्त प्रबंधन, 1600 नियमित तसेच 1200 दूरस्थित कर्मचाऱ्यांची संघटनात्मक जबाबदारी, तीसुद्धा जगभरातील वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीत पार पाडण्याचं काम उपेंद्र यांनी एकट्याच्या खांद्यावर तोलून धरलं आणि निभावलं आहे.

जेव्हा त्यांना विचारणा केली, की अशा बलाढ्य आकाराच्या टीमचं नेतृत्व करायला नेमकं काय करावं लागतं ? त्यावर उपेंद्र सांगतात, "माझी नेतृत्वाची शैली म्हणजे एक ताळमेळ आहे. व्यावसायिक चातुर्य आणि तांत्रिक ज्ञानाचा. व्यावसायिक चातुर्यात समाविष्ट आहे ते तुमच्या व्यवसायाचे ज्ञान आणि मिळकत नफा, तुमचे ग्राहक, स्पर्धेचा पट आणि कंपनीची आंतरिक शक्ती. तांत्रिक कुशाग्रतेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जाणकारी, हा एक गुण पुरेसा आहे. प्रभावी नेता होण्यासाठी तांत्रिक बाजूंची जाणकारी असणे अत्यंत आवश्यक असते. तांत्रिक ज्ञानाशिवाय यही कुणी लोकांचा नेता बनू शकेल पण तो एक प्रभावी तांत्रिक नेता होऊ शकणार नाही. माझ्या मते नेतृत्वाच्या स्थानी असलेल्या व्यक्तीला नावीन्याचा ध्यास असायला हवा. जे काही केलं जात असेल त्यात केवळ उत्कृष्टतेचा आग्रह हवा. प्रत्येक बाबतीत एकूण एक बारकाव्यांवर त्यांची नजर असावी. खुल्या संवादाचा तो पुरस्कर्ता असावा. संकट समयी आलेल्या अनुभवांचे जतन करणारा, दूरदृष्टीचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला सहकार्यांप्रती विश्वास आणि आदर भाव असावा.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division