'राजेश एक्स्पोर्ट्स'चा स्विस सोने शुद्धीकरण कंपनीवर ताबा

Rajesh Mehta 4C 621x414राजेश एक्स्पोर्ट्स लिमिटेडने जगातील सर्वात मोठा सोने शुद्धीकरण (रिफायनरी) सुविधा असलेल्या 'व्हाल्कम्बी' या स्विस कंपनीवर ताबा मिळविल्याची सोमवारी घोषणा केली. सुमारे २,५६० कोटी रुपयांच्या (४० कोटी अमेरिकी डॉलर) मोबदल्यात झालेल्या या ताबा व्यवहाराने राजेश एक्स्पोर्ट्सला आवश्यक कच्चा माल तुलनेने स्वस्त मिळविता येईल.

या व्यवहारामुळे राजेश एक्स्पोर्ट्सकडे सध्या भारतात असलेल्या सोने शुद्धीकरण  क्षमतेत वाढ आणि तंत्रज्ञानात्मक सुधार साधता येईल, असा विश्वास कंपनीचे अध्यक्ष राजेश मेहता यांनी व्यक्त केला. सध्या प्रति वर्ष ८० टन असलेली कंपनीची देशांतर्गत सोने शुद्धीकरण क्षमता चालू वर्षांत २०० टनांवर जाणे अपेक्षित आहे. शिवाय 'व्हाल्कम्बी'मुळे कंपनीची कच्चा माल म्हणून सोन्याची आयात संपूर्णपणे आणि पूर्वीपेक्षा कमी खर्चात भागविली जाईल, असे मेहता यांनी सांगितले.

DEASRA MUV ADVT

Cbmpl Creative Division