'एसबीआय' तर्फे गृहकर्जदारांसाठी आनंदवार्ता
'एसबीआय'ने गुरुवारी गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी एका आगळ्यावेगळ्या योजनेची घोषणा केली आहे. मरगळलेल्या स्थावर मालमत्ता क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी भारतीय स्टेट बँक सरसावली आहे. निर्माणाधीन (under construction) गृह प्रकल्पांत घर खरेदी करणाऱ्या कर्जदाराला निर्धारित वेळेत घराचा ताबा मिळाला नाही तर कर्जदाराला कर्जाची रक्कम परत करण्याचे बँकेने जाहीर केले आहे. परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांसाठी ही योजना लागू असून त्यात बिल्डरला ताबा प्रमाणपत्र (OC) मिळेपर्यंत बँक कर्जाची हमी घेईल. या योजनेने ग्राहकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास बँकेने व्यक्त केला आहे.